
बातमी कट्टा:- भाजपाचे तालुकाध्यक्ष व वाघाडी गावातील सरपंच किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात जिवघेना हल्ला झाल्याच्या निषेधार्थ शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर ग्रामस्थांचा काळ्या फिती व काळे झेंडे दाखवत निषेध मुक मोर्चा धडकला.यावेळी या हल्ल्याच्या घटनेसोबतच शिरपूर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला.
व्हिडिओ साठी लिंक क्लिक करा https://youtu.be/aOljCOElRwA?si=R5XL1UqBKDkK4MQZ

व्हिडिओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/aOljCOElRwA?si=R5XL1UqBKDkK4MQZ
काल दि २० रोजी सकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील सरपंच व भाजपाचे शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायतीत भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली यात किशोर माळी यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले घटनेनंतर पोलिस स्टेशनात फिर्याद दाखल करण्यात आली आणि यातील दोन संशयितांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. किशोर माळी यांच्या झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वाघाडी येथील महिला व ग्रामस्थ तरुण तरुणींसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिरपूर शहरातील वराडे येथून शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर मुक मोर्चा काढला या मोर्च्यात पुरुषांसह महिला तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.विशेष म्हणजे या मोर्चा दरम्यान एकही पोलिस वाहन नव्हते.
व्हिडिओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/aOljCOElRwA?si=R5XL1UqBKDkK4MQZ

व्हिडिओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/aOljCOElRwA?si=R5XL1UqBKDkK4MQZ
शिरपूर शहर पोलिस स्टेशनच्या आवारात मोर्चा धडकल्यानंतर अनेकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.पोलिसांच्या कामगिरीवर यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले.गुंडगिरी वाढत असतांना पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.यावेळी महिलांनी देखील आक्रोश व्यक्त केला.मुलींना शाळेत जाण्याची देखील भीती वाटते,गावात अवैध दारु विक्री होतांना देखील पोलिसांकडून लक्ष दिलै जात नसल्याचे यावेळी तरुणीने सांगितले.मुक मोर्चात शिरपूर तालुका काँग्रेस कमिटी, शिवसेना उबाठा, सावता परिषद,अखिल भारतीय माळी महासंघ, शिवसेना शिंदे गट, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, मनसे, शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशन,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, करणी सेना यांनी निवेदनाद्वारे सहभाग नोंदवत शिरपूश शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले.