नायब तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक…

बातमी कट्टा:- नायब तहसीलदारांच्या खाजगी चारचाकी वाहनावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात संशयितांकडून दगडफेक झाले असून घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होत पुढील कारवाई सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील हिंगोणी बोरगाव गावादरम्यान हिंगोणी शिवारात शिरपूरचे नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर हे एम.एच 39 एबी 8580 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनाने कारवाईसाठी गेले होते.वाहन उभे करुन वाहनातून उतरुन ते कारवाईसाठी पुढे गेले असतांना अचानक अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.या दगडफेकीत वाहनाचे समोरील काच फुटले आहेत.

घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी तहसीलदार आबा महाजन यांच्यासह महसूल पथक व पोलीस प्रशासन दाखल झाले होते.घटनास्थळावरुन नुकसानग्रस्त वाहन पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले असुन पुढील कारवाई सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: