बातमी कट्टा:- नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरीकांना गंभीर दुखापत होत असल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. अगामी संक्रांतीच्या दिवसात पतंग उडविण्याकरीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त सुचना केल्या होत्या.त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने 13 हजार 950 किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करत एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहिती च्या आधारे धुळे शहरातील अकबर चौकात अपना बेकरी समोरील पतंग विक्रेता नामे अताउर रहिमान एकलाख अहमद हा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील, योगेश राउत,बाळासाहेब सुर्यवंशी, कमलेश सुर्यवंशी, राहुल रवींद्र गिरी आदींनी दि 8 रोजी पतंग विक्रीच्या दुकानात छापा टाकला यावेळी पथकाने 360 नायलॉन मंजाचे छोटे रोल,33 नग नायलॉन मंजाचे प्लॉस्टीक बंडल व 2 नग नायलॉन मांजाचे सिल्वर रंगाची चकरी असा एकुण 13 हजाळ 950 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.विक्रेता अताउर रहिमान एकलाख अहमद वय 27 रा.अपना बेकळी समोर अकबर चौक धुळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारावाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,प्रकाश पाटील, योगेश राऊत,बाळासाहेब सुर्यवंशी ,कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी,गुलाब पाटील आदींनी केली आहे.