नाशिक येथील महाराणा प्रताप उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप सिसोदिया, 2 जून रोजी होणार जयंती साजरी….

बातमी कट्टा:- सालाबादा प्रमाणे राष्ट्रपुरुष महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती गुरुवार दि.2 जून 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्था व महाराणा प्रेमींची सामुहिक नियोजन बैठक महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात पार पडली. सदर बैठकीत सर्वानुमते रत्नदीप सिसोदिया यांची जयंती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी जर्नादन पाटिल तसेच अँड. मोहनसिंह कनोजे सिसोदिया, सचिव, खजिनदार विकाससिंह गिरासे, प्रसिध्द प्रमुख करणसिंह बावरी, पुतळा समिती प्रमुख नाना जाधव, मिरवणुक प्रमुख विरेंद्र टिळे, सदस्य गनसिंह शिरसाठ, सोमनाथ भोंड, सचिन राजपूत अधिक पदाधिकाराची निवड सर्वानुमते झाली. यावर्षीच्या जयंतीचे मुख्य आकर्षन चितोडगड-मेवाड येथील रावत युग प्रदिपसिंहजी हमीरगड चे वतनदार तथा रावत परिवाराचे वशंज व विश्वदिपसिंह जयसिंह राऊळ, रंजाने संस्थान हे देखील जयंतीच्या सर्व उपक्रमांना सहभागी राहणार आहेत. जयंती दिनी आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आधी उपक्रमासह सुर्यतेज महाराणा प्रतापाच्या पुतळ्याचे पुजन सकाळी राणा प्रताप चौकात होईल. पारंपारिक प्रथेनुसार जयंती मिरवणुक भालेकर ग्राऊड येथुन जयंती दिनी सायंकाळी काढण्यात येईल असे अध्यक्ष रत्नदीप सिसोदिया यांनी बैठकीत सांगितले जयंती व्याख्यानमाला अध्यक्ष जयदिप राजपूत यांनो तीन दिवसीय व्याख्यानमालेची नियोजन सुरु असून लवकरच व्याख्यात्यांची नावे जाहीर करणार असल्याची सांगितले. सदर बैठकीला जगतसिंह जाधव, जयप्रकाश गिरासे, भवानसिंह सोलंकी, राजेंद्रसिंह चौहाण, दिलीपसिंह पाटिल, सुरेंद्र पाटील, मिलींद राजपूत, सी. बी. गिरासे, रामसिंह बावरी, सुनिलसिंह परदेशी, राजेंद्र पाटील, सौ. देवयानी दि. पाटिल, •भारतसिंह परदेशी, धर्मा साळुंके, वाल्मीक राजपूत, विरेंद्रसिंह टिळे, जितेंद्र सिसोदिया, अमोल परदेशी, डि. आर पाटिल, सचिन राजपूत, राहुल परदेशी, योगेंद्र राजपूत, संजय गिरासे, सुमित राजपूत, जयदिप पवार आदीसह मोठ्या संखेने समाज बांधव व महाराणा प्रेमी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: