निकीता पाटीलच्या खूनाच्या घटनेनंतर नजीक आढळला तरुणाचा मृतदेह,

बातमी कट्टा:- धुळ्यात 21 वर्षीय तरुणीच्या हत्येची घटना घडल्यानंतर पोलीसांना त्या घटनास्थळापासून काही अंतरावर 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.तरुणीच्या हत्येचा आणि तरुणाच्या आत्महत्येचा काही संबध आहे का ? या दिशेने पोलीस तपास करत असून आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कपड्यांवर मात्र रक्ताचे डाग आढळून आले आहेत.तरुणीच्या भावाने फिर्यादीत संशय व्यक्त केलेला तरुण मात्र अद्याप फरार आहे.यामुळे तरुणीची हत्या ,तरुणाची आत्महत्या आणि फरार झालेला संशयित यासंपूर्ण घटनेचा त्रिकोण तपास पोलीसांकडून सुरु आहे.

बघा व्हिडीओ

धुळे शहरातील नकाणे रोड परिसरातील बालाजीनगर येथे निकीता कल्याण पाटील ही 22 वर्षीय तरुणी सांयकाळी घरात एकटी असतांना अज्ञात संशयिताने घरात घुसून निकीता पाटील हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत निकीता पाटील हिचा खून केला व घटनास्थळावरून संशयित फरार झाला घटना दि 22 रोजी सायंकाळी घडली होती.या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या समवेत पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.श्वानपथक व ठसे तज्ञांकडून तपास सुरू करण्यात आला.तर निकीता पाटील हिचा भाऊ याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद देत प्रेमसंबधाला नकार दिल्याने महेश मराठे याने निकीता पाटीलचा खून केल्याचा संशय व्यक्त करत खूना गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु झाला आहे.

बघा व्हिडीओ

मात्र दि 23 रोजी सकाळी निकीता पाटील हिच्या खूनानंतर काही अंतरावर अनिकेत वाल्मिक बोरसे रा.महालेनगर मोगलाई या 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.त्याच्या जवळ विषारी औषधाची बाटली ,सायकल मिळुन आल्याने अनिकेत पाटील याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे तर अनिकेत बोरसे याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत.मृत अनिकेत बोरसे याच्या अंगावर असलेले रक्ताचे डाग नेमके कोणाचे ? याकडे पोलीसांनी तपास सुरु केला आहे. निकीता पाटील हिच्या खूनाचा आणि अनिकेत बोरसे याच्या आत्महत्येचा काही संबध आहे का? आणि फिर्यादीत महेश मराठे याच्यावर खूनाचा संशय व्यक्त केल्याने हा संपूर्ण प्रकार चक्रवणारा आहे. घटनेनंतर फरार झालेला महेश मराठे पोलीसांच्या ताब्यात आल्यानंतरच संपूर्ण घटनेचा योग्य तो प्रकार समजण्यात पोलीसांना मदत होणार आहे. मात्र तरुणीच्या हत्येच्या घटनेनंतर काही अंतरावर अनिकेत बोरसे याने आत्महत्या केल्याने या संपूर्ण प्रकारणाचे गुढ वाढले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: