निमखेडी येथे डिजिटल शाळेचे उद्घाटन…

बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील निमखेडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल शाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


निमखेडी येथे जिल्हा परिषद अंतर्गत पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे. या शाळेत गावातील विद्यार्थी मोठ्या पट संख्येने शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना डिजिटल युगाचे शिक्षण उपलब्ध व्हावे. यासाठी सरपंच उमेश मोरे यांच्या निधीतून माजी सरपंच सतिष पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोशन खैरनार यांच्या संकल्पनेतून जि. प. शाळेला दोन टीव्हीसह एक प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना टीव्ही व प्रिंटरचा शैक्षणिक कामासाठी फायदा होणार असून गुणवत्ता वाढणार आहे.
तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून नुकतेच शाळेचे रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम उत्तमपणे करण्यात आले होते. यामुळे शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे. शाळेचे रूपडे पलटले आहे. यामुळे शाळा 99% टक्के डिजिटल झाली असल्याचा विश्वास उपस्थितांनी केला. डिजिटल शाळेसह साहित्यांचे उद्घाटन माजी सरपंच सतिष पाटील, विद्यमान सरपंच उमेश मोरे, उपसरपंच महेंद्र ठाकरे, ग्रा. पं. सदस्य आनंदा पाटील, राजेंद्र पाटील, भिका मोरे, रोशन खैरनार, सतिष ठाकरे, अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुनिल पाटील, गोकुळ भिल, कृष्णा पवार, भावेश भदाणे, शुभम भदाणे, दिलबर मोरे, भाईदास भिल, गोपाल पाटील, ग्रामसेवक मालती देवरे, रोजगार सेवक हितेंद्र खैरनार, शिपाई रावण पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्यध्यापक सुहास जैन, शिक्षक भास्कर गवळे, शिक्षिका सोनल ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp
Follow by Email
error: