निमखेडी येथे भुमिगत गटारीच्या कामाला सुरुवात,विविध मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील निमखेडी येथे आदिवासी भागात भूमिगत गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर हे काम ग्रामपंचायत निधीतून सरपंच उमेश मोरे यांच्या माध्यमातून माजी सरपंच सतिष पाटील, रोशन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.


या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य आनंदा पाटील, उपसरपंच महेंद्र ठाकरे, राजेंद्र सुकलाल पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, रतिभान पाटील, भिका मोरे, सतिष ठाकरे, मगन मालचे, शकील शेख, देविदास पाटील, चुडामन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढील वृत्त असे की, निमखेडी येथील आदिवासी भागात सांडपाणी काढण्यासाठी गटारी नसल्याने पाणी बाहेरच काढण्यात येत होते. तसेच काही ठिकाणी खराब पाणी जास्तीचे साचल्यामुळे नागरिकांना विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. यासाठी या परिसरात गटारीचे काम व्हावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती. सदर हा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. याची तात्काळ दखल घेऊन विद्यमान सरपंच उमेश मोरे यांनी ग्रामपंचायत निधीतून भुमिगत गटारीचे काम करण्यास सुरुवात केली आहे. या कामाला गती दिल्यामुळे ग्रामस्थांतर्फे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बबलू पाटील, भूषण पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, विठ्ठल भिल, बापु भिल, कृष्णा ठाकरे, रामचंद्र ठाकरे, राहुल भिल, संतोष मोरे, चुडामन निकम, जगन बैसाने, छोटु मोरे, गोकुळ ठाकरे, तुकाराम भिल, वसंत भिल, भटु दळवे, दिलबर मोरे, समाधान पाटील, गोपाल पाटील, चेतन पाटील आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: