बातमी कट्टा:- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे एकाच संशयिताकडून विस तलावारी जप्त केले आहेत. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी ही कारवाई केली असून एकाच व्यक्तीडून या तलावरी मिळुन आल्याने पोलीसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
नंदुरबार जिल्ह्यात उद्या होणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दि 4 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल २० तलवारी जप्त केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.याप्रकरणी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या नंदुरबार पथकाने धडगाव येथून तलावारी जप्त केल्या असू संजय कागद्या वळवी वय ३८ यास ताब्यात घेतले आहे.सदर कारवाई थानिक गुन्हे शाखेचे रविंद्र कळमकर,हवा.विनोद जाधव,जितेंद्र अहिरराव, अभिमन्यू गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली.