बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत निमखेडी येथील पै. कोमल मोरे, पै. सचिन बैसाने, पै. प्रेम पाटील, पै. गणेश मालचे या मल्लांनी प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत विजय मिळवला. यामुळे निमखेडी ग्रामस्थांची मान उंचावली आहे. या विजयानिमित्त केंद्रीय पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सचिव पै. रोशन खैरनार यांच्यातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या विजयाबद्दल मा. सरपंच सतिष पाटील, विद्यमान सरपंच उमेश मोरे, ग्रा.पं. सदस्य आनंदा पाटील, राजेंद्र पाटील, सतिष ठाकरे, मगण मालचे, जवान दिनेश जाधव, प्रकाश पाटील, रावण पाटील, बाबूलाल पाटील, विनोद बैसाने, पै. सुरेश पाटील, जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष बारकू पवार, दादू भिल, मनोज ठाकरे, गौरव भदाणे, समाधान पाटील, चेतन पाटील, गोपाल पाटील, राजू भिल, जितू निकम, मयूर पाटील, जयेश पाटील, सागर सोनवणे यांच्या हस्ते विजेत्या चौघा मल्लांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.