
बातमी कट्टा:- जेवन करून परत येतो अस सांगुन परत न आल्याने त्यांना पाहण्यासाठी गेले असता पती आणि पत्नी दोघांचा ही मृतदेह विहीरीच्या बाजुला असलेल्या पंपहाऊस येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील नकाणे गावातील विक्रम आनंदा मोरे हे सोमवारी दुपारी वाडीभोकर शिवारातील शेतात काम करीत असतांना त्यांचा मोठा मुलगा रवींद्र मोरे वय 23 व सुन नयनाबाई रवींद्र मोरे वय 21 हे दोघेही पती पत्नी डबा देऊन घरी जाऊन जेवण करून येतो असे सांगितले मात्र ते दोघेही पती-पत्नी परत न आल्याने त्यांना बघण्यासाठी विक्रम मोरे हे गेले यावेळी शोधाशोध केली असता वाडीभोकर गावाची विहीरीच्या बाजूला असलेल्या पंपहाऊसमध्ये रवींद्र मोरे आणि त्याची पत्नी नयनाबाई मोरे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले.याबाबत विक्रम मोरे यांनी दिलेल्या खबरवरून पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.