बातमी कट्टा:- प्राथमिक शिक्षक असतांना चित्रपट दिग्दर्शक होण्यासाठी पत्नीला माहेरहून 5 लाख रूपये आणण्यासाठी पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास दिला,चारित्र्यावर संशय घेत मारहाण, शिवीगाळ करण्यात येत होती.नेहमी होणाऱ्या पतीच्या असह्य त्रासाला कंटाळून पत्नीने दोन्ही मुलीचा गळा आवळून हत्या करत स्वताने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी आत्महत्येस कारणीभूत धरत पती सह सहकारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र आता मा. न्यायालयातर्फे त्या शिक्षक पतीला 10 वर्ष सक्त कारवासाची शिक्षा व दोन लाख रूपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे 4 ऑक्टोबर 2016 रोजी गोकुळ भिला वाडीले वय 30 याची पत्नी सुनिता गोकुळ वाडील हिने रिया व परी अशा दोन्ही लहान मुलींची गळा आवळून हत्या करत स्वताने घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.पती गोकुळ वाडीले हा प्राथमिक शिक्षक होता.गोकुळ वाडीले व त्याच्या सहकारींनी गोकुळ वाडीले यास चित्रपट दिग्दर्शक होणेसाठी पत्नी सुनिता वाडीले हिने माहेरहून 5 लाख रूपये आणावेत यासाठी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करत चारित्र्याव संशय घेत मारहाण ,शिवीगाळ केली त्यांच्या असह्य त्रासाला कंटाळून सुनिता हिने दि 4/10/2016 रोजी स्वताच्या दोन्ही लहान मुलींची हत्या करत सुनिता वाडीले यांनी वरच्या छताला दोरीने बांधून आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी गोकुळ भिला वाडीले यास मा.न्यायालयाने दोषी ठरवून 10 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा व 2 लाख रुपये दंड ,आरोपी यांनी दंड न भरल्यास 1 वर्ष साध्या कारवासाची शिक्षा ठोठावली. तसेच भादंवि कलम 498-अ अन्वये 2 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा व 10 हजार रूपये दंड तसेच भादवी कलम 323 अन्वये 3 महिने सक्त कारावास व एक हजार दंड अशी शिक्षा सुनावली.तसे गुन्ह्यातील इतरांना दोषमुक्त केले आहे.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशना पती गोकुळ वाडीलेसह सहकारी विरुध्द गुन्हा आत्महत्या करणेस भाग पाडले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस.डी.सानप यांनी केला व मा.न्यायालयात दोषारोप दाखल केले.याप्रकरणाचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश-6 एच.ए.मुल्ला यांच्या समक्ष चालविण्यात आलेले असून यात एकुण 9 साक्षीदार तपासण्यात आल्यांत.सदर प्रकरणात जिल्हा सहा.सरकारी अभियोक्ता निलेश.बी.कलाल यांनी सरकार पक्षाची बाजू ठामपणे मांडून घटनेतील मयत सौ.सुनिता वाडीले मयत मुली रिया व परी तसेच फिर्यादी मनोज कालुराम मोरे रा.शेंधवा यांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले सदर कामी जिल्हा सरकारी अभियोक्ता डी.वाय.तवर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.