बातमी कट्टा:- पत्नी झोपेत असतांना मरण पावली असल्याची तक्रार पतीने दि 16 फेब्रुवारी 2016 रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात तक्रार दिली होती.त्या गुन्ह्याचा सखोल तपास करत तब्बल तिन वर्षानंतर उलगडा करत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी 2019 साली तक्रारदार पतीला पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतले होते. याबाबत आता मा.न्यायालयाने सदर संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
शिरपूर तालुक्यातील तऱ्हाड कसबे येथील तत्कालीन पोलीस पाटील हेमराज नामदेव चव्हाण यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दि 18 /2/2016 रोजी तक्रार दिली होती.त्यात म्हटले होते की,हेमराज चव्हाण याची पत्नी ज्योती हेमराज चव्हाण हि झोपेत असतांना मरण पावली असल्याचे म्हटले होते .याबाबत मृतदेहाची उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते.मात्र त्यावेळी डॉक्टरांनी मृत्यू बाबत निश्चित अभिप्राय दिला नव्हता.2019 साली शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारला असतांना सदर घटनेचा तपास करुन डॉक्टरांशी संपर्क साधून त्याच्यांशी चर्चा केली त्यावरुन संबधीत डॉक्टरांनी कागदपत्रांची तपासणी करुन मयत महिला ज्योती चव्हाण यांचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याचे सांगितले याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करुन तक्रारदार हेमराज नामदेव चव्हाण याला ताब्यात घेतले होते.याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या कडे होता.या गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करुन सक्षम पुरावे करुन संशयित हेमराज चव्हाण याच्या विरुध्द मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
सदर खटल्याचे कामकाज अतिरीक्त सत्र न्यायाधीश एजाज एच सैय्यद सत्र न्यायालय क्रमांक 3 यांचे न्यायालयात होऊन साक्षी पुराव्याअंती आरोपीनामे हेमराज नामदेव चव्हाण यानेच त्याची पत्नी ज्योतीबाई हेमराज चव्हाण हिचा गळा दाबुन तिस जिवे ठार मारल्याचे सिध्द झाल्याने मा. न्यायालयाने आरोपीतास जन्मठेप व 2000 रुपये दंड ,दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील निलेश कलाल यांनी पाहिले असुन गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि दिगंबर पाटील, रविंद्र माळी,ललीत पाटील, तुकाराम गवळी यांनी तपासकामात मदत केली तसेच पैरवी अधिकारी पओकॉ प्रदीप पाटील यांनी गुन्ह्याच्या सुनावणी दरम्यान कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.