पत्याचा डाव पोलीसांनी उधळला,12 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त…

बातमी कट्टा:- पत्यांचा डाव रंगला असतांनाच पोलीसांनी छापा टाकून 41 हजारांची रोकडसह सुमारे 12 लाख 71 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे एकच धावपळ उडाली होती.कारवाईत मध्यप्रदेश येथील इसमांसह दोन स्विफ्ट कार बुलेट,व तीन मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील चारणपाडा गावाच्या समोर नाल्याच्या पलीकडे काही जण पत्त्यांचा हारजीतचा खेळ खेळत असल्याची गोपणीय माहिती (सांगवी) तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती.याबाबत पोलीस पथक चारणपाडा येथे जाऊन एका हॉटेलवर सरकारी वाहन उभी करून माहिती मिळालेल्या ठिकाणी पायी पायी गेले असता काटेरी झुडपाच्या आडोश्याला काही लोक पते खेळत असतांना त्यांच्यावर पोलीसांनी छापा टाकला यात पोलिसांनी मुकेश शेरू कुमावत वय 30 रा.मेहरगाव ता.अजंड जि.बडवानी,दगडू बलबीर बेलदार वय 28 रा किसमतनगर शिरपूर,शाहरुख शेख सईद शेख वय 26 सेंधवा,शफी मुहमंद नियाज मोहम्मद वय 48 शेंधवा,विजय संतोष शिरसाठ वय 29 रा.सेंधवा,व इतर दोन इसम यांच्या सह 41 हजार रोकड 12 लाख 30 हजार किंमतीचे दोन स्विफ्ट कार,बुलेट व तीन मोटरसायकली असा एकुण 12 लाख 71 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यांच्या विरुद्ध प्रविण धनगर यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, संदीप पाटील, भिकाजी पाटील, कैलास जाधव,संजय सुर्यवंशी, सुनील पाठक,अनिल चौधरी,गंगाधर सोनवणे,चत्तरसिंग खसावण,जाकीरोदीन शेख,संदीप ठाकरे, सांगर ठाकूर, रोहिदास पावरा आदींनी कारवाई केली.

WhatsApp
Follow by Email
error: