बातमी कट्टा:-मोटरसायकलीला कट लागल्याने अपघात होऊन भरधाव ट्रालाने तरुणीला चिरडल्याची घटना आज दि 19 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. परिक्षेसाठी जात असतांना हा भीषण अपघात झाला असन या अपघात एक तरुण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवी सावरट गावाजवळील महामार्गावर मोटर सायकलीला कट लागल्याने मोटरसायकल दुर फेकली गेली.यावे आयटीआयचा परिक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी जाणाऱ्या आरती सुमन गावीत वय २१ रा वडखुट या तरुणीला ट्रालाने चिरडले तर क्रिष्णा जोल्या गावीत वय २३ रा. पाटीबेडकी गंभीर जखमी झाला आहे. ट्राला चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरु केले.अपघात नंतर ट्रालाचालक घटनास्थळावरुन फरार झाला.रूग्णालयात नातेवाईक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी आरती गावीत हिच्या नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला.