
बातमी कट्टा:- परिवार वादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळे दौऱ्यावर असतांंना पत्रकारांशी बोलतांंना केला आहे.क्षमता असतांना अजित पवारांना डावलत शरद पवार यांनी मुलीच्या प्रेमात येऊन पक्षाची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवल्याने अजित पवार यांनी हा बंड केल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

काल दि 4 रोजी धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे धुळे येथे आले होते.त्यांनी पत्रकारांशी बोलतांना परिवार वादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. शरद पवार यांनी मुलीच्या प्रेमात येऊन अजित पवारांसारख्या नेत्याला डावलून पक्षाची धुरा ही सुप्रिया सुळेंकडे सोपवली. क्षमता असलेल्या अजित पवारांना डावलण्यात आल्याने हा बंड झाल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. अजित पवार सोबत सत्तेत सहभागी झाल्यामुळे हे सरकार अधिक मजबूत झाले आहे. सद्यस्थितीत आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांची अवस्था ही बिकट आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे न्यायालय ठरवेल, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना न्यायालयातून न्याय मिळाला, तसाच न्याय अजित पवारांनाही मिळेल असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापने दरम्यान सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत. प्रत्येकाचा मंत्रीपदाचा कोटा ठरलेला आहे. त्याच्यामुळे वाद विवाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा त्यांनी सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेसोबत आल्यामुळे कार्यकर्ते शॉक मध्ये आहेत. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते या धक्क्यातून बाहेर पडतील असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वेळेस पहाटेचा शपथविधीचा प्रयोग फसला होता, मात्र या वेळेस अजित पवार यांनी पूर्ण विचारांशी निर्णय घेतला असून, प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचले जात असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केले असल्याचे पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजन यांनी सांगितले.