

बातमी कट्टा:- मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन पळासनेर ता.शिरपूर येथे संशयित येत असल्याची गोपणीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा पोलीसांनी पळासनेर येथे सापळा रचत दि 11 रोजी संशयिताला अटक केली आहे. संशयिताकडून एकुण २० गावठी बनावटीचे पिस्तूल,एक गावठी बनावटीची मशिनगन २ मॅग्झीनसह २८० जिवंत काडतुसेस जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार ठाणे(मुंबई) येथील वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथील पाहीजे आरोपी सुरजीतसिंग उर्फ माजा हा विक्री करीता मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रसाठा घेवुन शिरपूर तालुक्यातील पळासनेर या गावी येणार असल्याची गोपणीय माहिती दि.१० रोजी गुन्हे शाखा घटक ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, यांना प्राप्त झाल्याने तात्काळ गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे येथील पोलीस पथक आरोपीचा शोध घेणेकामी धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे येऊन पथकाने सापळा रचला असता सदर गुन्हयातील पाहीजे आरोपीत नामे सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग वय २७ रा. मु.उमर्टीगाव पो.बलवाडी ता. वरला जि. बडवानी,मध्यप्रदेश हा एकुण २० गावठी बनावटीचे स्टिल पिस्तूल,१ गावठी बनावटीची मशिनगन २ मॅग्झीन व २८० जिवंत काडतुसे सह पळासनेर येथे विक्री करीता आल्याने त्यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले असुन वरील अग्निशस्त्र व जिवंत काडतुस असा साठा जप्त करण्यात आले आहे.त्यास मा. न्यायालयाने दि. १८ जुलै रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, घटक ५, वागळे पोलीस स्टेशन, ठाणे कडील स.पो.निरीक्षक भुषण शिंदे यांच्या कडुन करण्यात येत असुन सदरचा शस्त्रसाठा हा कोणत्या कारणाकरीता विक्री करणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त जयजित सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे ,अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले,पोलीस उप आयुक्त गुन्हे (अतिरिक्त कार्यभार) राजेंद्रकुमार दाभाडे,पोलीस उप आयुक्त गुन्हे, शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे युनिट-५, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहा. पो. नि.भुषण शिंदे, सहा. पो. नि. अविनाश महाजन, पो.उप.निरी/ सुनिल अहिरे, पो. हवा / संदिप शिंदे, पो. हवा. / रोहीदास रावते, पो. हवा. / सुनिल निकम, पो. हवा / शशिकांत नागपुरे, पो.हवा / विजय पाटील, पो. हवा / माधव वाघचौरे, पो.हवा / सुनिल रावते, पो. हवा / विजय काटकर, पो. हवा / अजय साबळे, म.पो. हवा / सुनिता गिते, म.पो. हवा / मिनाक्षी मोहिते, पो.ना. / उत्तम शेळके, पो.ना. / तेजस ठाणेकर, पो. शि/ यश यादव,आदींनी केली आहे.
