बातमी कट्टा:- खाजगी कंपनीच्या पवन सौर उर्जा टॉवर च्या उंच टोकाला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे.सौर उर्जा टॉवरच्या उंच टोकावर ही आग लागलेली होती.आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.पोलीसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या टिटाणे परिसरात खाजगी कंपनीच्या सौर ऊर्जा टॉवरला अचानक आग लागल्याची घटना घडली. सौर ऊर्जा टॉवरच्या उंच टोकावर असलेल्या केबिनला ही आग लागली होती. बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले होते.मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पवन ऊर्जा टॉवर पोल क्र 116 च्या अत्यंत उंचावर ही आग लागली असल्याने आग विजवण्यासाठी संबधीत यंत्रांना कसरत करावी लागली आहे.या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली मात्र गावात या घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले आहे.
या भागात मुसळधार पाऊसला सुरवात झाली, त्याच दरम्यान ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे तर काहींच्या मते वीज पडून तर काहींच्या मते शाॅर्ट सर्कीट झाल्यामुळे ही आग लागल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र आग विझल्यानंतरच या आगीच्या कारणाचा उलगडा होणार आहे.या घटनेचा निजामपूर पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.