पहाटेच्या सुमारास एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

बातमी कट्टा:- आज दि 27 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांकडून एस.बी.आयचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.एटीएम मशीन फुटत असल्याचे माहिती मुंबई येथील कार्यालयात कळताच त्यांनी तात्काळ शिरपूर तालुका पोलिस स्टेशन व गावातील नागरिकांना माहिती कळविल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. एटीएम मशीनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून चोरीचा प्रयत्न झाला असून चारचाकी वाहनातून चोर आल्याचे बाहेरील सिसिटीव्ही कॅमेरात दिसून आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार बोराडी बसस्थानका जवळील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोरील एटीएम मशीन पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दि 27 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.एटीएम मशीन रुम मध्ये प्रवेश करण्याआधी चोरट्यांनी बाहेरील व आतील सी.सी.टी.व्ही कॅमेरात काळया रंगाचा स्प्रे मारुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. एटीएम मशीन रुममध्ये प्रवेश करतांना हातात छत्री घेऊन चेहरा लपवत असल्याचे एटीएम मशीन रुम समोरील बाहेरील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले आहे.एटीएम मशीन सोबत छेडछाड होत असल्याचे मुंबई कार्यालयाला सिग्नल मिळाल्याने मुंबई कार्यालयाने तात्काळ शिरपूर तालुका पोलीसांना संपर्क साधला.
एटीएम मशीन फोडण्यासाठी कटर सारख्या काहीतरी साहाय्याने कापण्याचा प्रयत्न करण्यात आला असून वेळीच पोलीस व नागरिकांना माहिती मिळाल्याने चोरटे पसार झाले.

एटीएम मशीन फोडण्याची घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे,संदिप पाटील,कैलास, योगेश मोरे, सुरेश ठाकूर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत भेट देऊन पाहणी केली पुढील कार्यवाही सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: