पहाटेच्या सुमारास “कार” जळून खाक

बातमी कट्टा:- मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास द बर्निंग कारचा थरार बघावयास मिळाला विशेष म्हणजे आगीने कार जळून खाक झाले मात्र घटनास्थळी कारमधील कोणीही व्यक्ती उपस्थित नव्हते.कार मधील चालक कोण ? कार कोणाची याबाबत काही एक माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.कारला आग लागली की लावली याबाबत काही एक माहिती मिळु शकलेली नाही.

शिरपूर तालुक्यातील मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आंबापाणीपाडा फाट्यावर सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास शिरपूरकडून सेंधवाकडे जाणाऱ्या कारला अचानक भीषण आग लागल्याची माहिती पोलीसांना मिळाली.या भीषण आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.आगीची माहिती मिळताच पहाटेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांचे पथक घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र वाहनाचा नंबरमालक आणि चालक बाबत माहिती मिळून शकली नाही घटनास्थळी कारच मधील कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.नेमकी कारला आग लागली की कारला आग लावली याबाबत कुठलीही माहिती मिळु शकलेली नाही.

WhatsApp
Follow by Email
error: