बातमी कट्टा:- धुळे शहराजवळ स्पेअर स्पार्ट तुटल्याने टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना आज दि १४ रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
अपघातात ट्रक उलटल्याने ट्रकमधील संपूर्ण टोमॅटो रस्त्यावर फेकले गेल्याने लाखोंचे नुकसान झाल आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगाव कडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रकचा धुळे शहराजवळील पारोळा चौफुली जवळ स्पेअर पार्टस तुटला यामुळे ट्रक उलटला.
या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असून टोमॅटोचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ट्रक मधील संपूर्ण टोमॅटो रस्त्यावर फेकले गेले आहे.