
बातमी कट्टा:- पहाटे झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर घरामागे झालेला अग्नी तांडव बघायला मिळाला.घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडला अचानक भीषण आग लागल्याने दोन ट्रॅक्टर ,ट्रॉली, मोटरसायकल, चारचाकी वाहन,गहु,मका यांच्यासह शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकरी योगेंद्रसिंग पदमसिंग राजपुत हे आपल्या कुटूंबासोबत घरात झोपलेले होते.पहाटे 5 वाजेच्या सुमारास योगेंद्रसिंग राजपुत हे झोपेतून उठून घराच्या मागील बाजूस आले तेव्हा घराजवळ असलेल संपूर्ण पत्राचे शेड जळून खाक झाल्याचे दृश्य त्यांना बघायला मिळाले हे बघितल्यानंतर योगेंद्रसिंग राजपुत यांनी आरडाओरड केली.ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते.दोन अग्निशमन बंबच्या मदतीने आग वाजविण्यात आली. पत्राच्या शेड मध्ये असलेले दोन ट्रॅक्टर , ट्रॉली, मोटरसायकल,इंडिका चारचाकी वाहन,गहु,मका यासह शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली आहे.पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
