बातमी कट्टा:- शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 7 जणांना नंदुरबार व धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर आज दि 9 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारे पिकप व ईको वाहनाचा भीषण अपघात झाला.दोंडाईचा कडून शिंदखेडाकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकप वाहन आणि शिंदखेडाकडून दोंडाईचा दिशेने जाणारी जी.जे 05,आर.ई 9497 क्रमांकाची ईको कार जात असताना बाम्हणे शिवारात शिवालय हॉटेल समोर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.या अपघातात एक व्यक्ती जागी ठार तर बाकी सात जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना दोंडाईचा येथुन धुळे व नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाल्यानंतर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहीकेला संपर्क साधण्यात आला होता मात्र तब्बल 1 तास उशीराने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती.यामुळे अपघातग्रस्तांना एकतास घटनास्थळी तात्कळत रहावे लागले .यामुळे उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केले आहे.