पाच हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक,धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची करवाई…

बातमी कट्टा:- घराचे नादुरुस्त असलेले विज मिटर बदलून देण्यासाठी व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी कनिष्ठ अभियंता यांच्या सांगण्यावरुन दहा हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत पथकाच्या धुळे विभागाने वरिष्ठ तंत्रज्ञ याला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

अमळनेर येथे राहणाऱ्या तक्रारदार याचे क्रांतीनगर येथील स्वताच्या मालकीच्या राहते घरात घरगुती विज मिटर सुमारे पाच महिन्यांपासून बंद पडले असल्याने तक्रारदार यांना दरमहा सरासरी रक्कमेची बिल आकारणी होत होती.सदर बिलाची तक्रादार नियमित भरणा करीत होते.दहा दिवसांपूर्वी महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख हे तक्रारदार यांच्या राहते घरी येवून विज मिटरची पहाणी करुन गेले होते.त्यानंतर सदर कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील हे तक्रादार यांंच्या घरी येवुन कनिष्ठ अभियंता देशमुखयांच्या सांगण्यावरून तक्रादारा यांना विज मिटर बदलण्याकरीता दहा हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते.त्याबाबत तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती.तक्रारीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अमळनेर येथे पडताळणी केली.दरम्यान आज दि ५ रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांचे सांगणे प्रमाणे नादुरुस्त विज मिटर बदलून देण्यासाठी व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती तक्रादाराच्या घरी पाच हजारांची लाच स्विकारतांना वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.

सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम,शरद काटके,संतोष पावरा, रामधास बारेला,भुषण खलाणेकर, भुषण शेटे,गायत्री पाटील, संदिप कदम,प्रविण पाटील,मकरंद पाटील, वनश्री बोरसे,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: