पाठलाग दरम्यान संशयितांचे वाहन रस्त्याच्या बाजूला पलटल्याचे आढळले, एटीएम हेराफेरी करणारे संशयित पसार

बातमी कट्टा:- एटीएमची हेराफेरी करून चारचाकी वाहनाने सुसाट पसार होणाऱ्या संशयितांचे चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटल्याची घटना घडली आहे.

शिरपूर शहरात आज सकाळी काही संशयित एटीएमची हेराफेरी करून आपल्या चार चाकी वाहनावर पसार झाले. घटनेची माहिती सर्वत्र पसरताच त्या वाहनाचा  पोलीस आणि काही ग्रामस्थांनी वाहनाचा मागवा घेत पाठलाग करत सुरु केला असताना संशयित शहादा रस्त्याच्या दिशेने वाहन घेऊन पळाल्याचे पोलिसांना समजले.त्यांचा पाठलाग सुरू असताना काही ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर अडवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित सुसाट वेगाने टेंभे ते भरवाडे रस्त्यावर वाहन पळवत असतांना कार रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटली‌. पाठलाग दरम्यान पोलीस आणि ग्रामस्थ वाहनाजवळ पोहचले तेव्हा संशयित चार चाकी वाहन सोडून पसार झाले होते.

WhatsApp
Follow by Email
error: