बातमी कट्टा:- सर्वत्र राज्यात गाजलेल्या शिरपूर पॅटर्न ची कहाणी आपणास ठाऊक आहे मात्र याच तालुक्यातील एका आदीवासी पाड्यातील घटना शिरपूर पॅटर्न ची सत्यता समोर मांडणारी आहे.पाणी संदर्भात बोल बाला असलेल्या या तालुक्यात आदीवासी समाजाच्या एक 10 वर्षीय लहान मुलगी विहीरीतून पाणी काढतांना त्या विहीरीत पडली.तीच्या मैत्रीणींच्या व उपस्थितींच्या मदतीने त्वरीत त्या मुलीला बाहेर काढले मात्र शिरपूर पॅटर्न सारख्या तालुक्यातून महिलांना विहीरीतून पाणी काढावे लागत असणार तर यापेक्षा दुर्भाग्य काय असु शकते ?

शिरपूर तालुक्यातील शिरपूर पॅटर्नची सर्वत्र चर्चा होती.मात्र याच तालुक्यातील सांगवी परिसरातील अरुणावतीपाडा येथील आदीवासी पाड्यातील योगीता प्रकाश पावरा या 10 वर्षीय मुलीला जिव धोक्यात घालून विहीरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने ती मुलगी विहीरीत पडली.वेळेतच तीच्या मैत्रणी व उपस्थित मुळे तीचे प्राण वाचले मात्र त्या 10 वर्षीय चिमुकलीसह येथील आदिवासी महिलांना विहीरीतून पाणी काढण्यासाठी जाणे म्हणजे येथील पाड्यांना पाण्याची किती भीषणता भोगावी लागत आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे.

राज्यभर पोहचलेल्या या शिरपूर पॅटर्न चा हा गाजावाजा कदाचित या पाड्यांवरील विहीरीतून जिव धोक्यात घालून पाणी काढणाऱ्या या महिलांपर्यंत पोहचली नसणार ! कधी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रस्ता ओलांडून तर कधी लांब जाऊन विहीरीतून पाणी घेण्यासाठी येथील आदीवासी महिलांना पाणीच्या थेंबा थेंबासाठी भटकंती करावी लागत आहे.सुदैवाने त्या 10 वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचले मात्र अशा पध्दतीने कुठलेही दुर्दैवी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
