पाणी पितांना बिबट्याची मान हंड्यात फसली…

बातमी कट्टा:- पाणी आणि भक्षच्या शोधात निघालेल्या बिबट्या गुरांच्या गोठ्यात शिरला आणि हंड्यात पाणी पिण्यासाठी तोंड टाकून पाणी पितांना मान अडकल्याने बिबट्या बिथरल्याची घटना घडली आहे.घटनेनंतर वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याची सुटका करण्यात आली.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जयरामनगर शिवारात कृष्णा चौरे यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्यात पाणी आणि भक्षच्या शोधात मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान बिबट्या शिरला. तहानलेल्या बिबट्याला समोर पडलेल्या तांब्याच्या हंड्यात पाणी दिसले पाणी पिण्यासाठी मान बिबट्याने हंड्यात टाकली होते तेवढे पाणी पिल्यानंतर बिबट्याची मान हंड्यातच अडकली.मानेला झटके दिल्याने मान हंड्यात पूर्णतः फसल्याने बिबट्या अधिकच बिथरला.काही दिसत नसल्याने त्याला पळण्याचा अंदाजही घेता येत नव्हता.

आवाज येत असल्याने शेतकरी कृष्णा चौरे यांनी गोठ्यात धाव घेतली तेव्हा हंड्यात मान अडकल्याने बिबट्या बिथरलेला दिसून आला.शेतकरी कृष्णा चौरे यांनी सरपंच कमलाकर साबळे घटनेची माहित देऊन घटनास्थळी बोलवले. घटनास्थळी संपूर्ण गावकऱ्यांनी धाव घेतली.यावेळी 

सहाय्यक वनसंरक्षक विठोबा अडकिने,वनक्षेत्रपाल सविता सोनवणे,पशुधन अधिकारी मंगेश हेमाडे,पशुधन अधिकारी संदीप कोकणी,प्राणी मित्र योगेश वारुडे वनपाल सौ नीता मस्के,एस.जे. पाटील,एस.आर. देसलेवनरक्षक गणेश बोरसे, रोशनी काकुस्ते, विजय राठोड, अजित साबळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.बिबट्याची मान हंड्यातून काढण्याचे शर्यतीच्या प्रयत्नानंतर बिबट्याची सुटका झाली.

WhatsApp
Follow by Email
error: