बातमी कट्टा:- धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे महानगरपालिका व भाजपाच्या विरोधात पाणी टंचाई व पाणी समस्याबाबत शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.पाणी टंचाईचा प्रश्न हा येत्या आठ दिवसांत निकाली काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेत हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे देण्यात आला.
धुळे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या ढिसाळ व शून्य नियोजनामुळे शहरामध्ये पाणी वेळेवर येत नाही. वेगवेगळ्या परिसरामध्ये, कॉलनी परिसरामध्ये आठ-दहा दिवसांनंतर तर काही ठिकाणी पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी सन 2018 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात / वचनात धुळेकर जनतेला दररोज पाणी देवू असे आश्वासन दिलेले होते. सन 2018 ते 2023 जवळपास साडेचार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी धुळेकर जनतेला वेळेवर पाणी मिळत नाही. भाजप व महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. महाराष्ट्र शासन व महाविकास आघाडीने पाणीपुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेला शेकडो करोंडाचा निधी दिला. परंतु भ्रष्ट कारभारामुळे सदर योजना वेळेवर पूर्ण होवू शकत नाही. महानगरपालिका दोन ते चार पटीने घरपट्टी वाढवित आहात.पण वेळेवर जनतेला पाणी देवू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे. जे पाणी येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण असते. गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.सदर पाणी टंचाईचा प्रश्न हा येत्या आठ दिवसांत निकाली काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेत हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आला.
यावेळी रणजीत राजे भोसले, जोसेफ आण्णा मलबारी, गोरख शर्मा, भानूदास लोहार, यशवंत डोमाडे, भिका नेरकर, मंगेश जगताप, जगन ताकटे, राजू सोलंकी, संजय माळी, संजय नेरकर, डी.टी.पाटील, जितू पाटील, राजू चौधरी, रईस काझी, अमित शेख, शोएब अन्सारी, सोनू घारु, शेख समद, मसुद अन्सारी, बरकत शहा, भटू पाटील, एजाज शेख, विशाल केदार, चेतन पाटील, सागर चौगुले, भूषण पाटील, शकीला बक्ष, मंगला मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.