बातमी कट्टा:-भरधाव मोटरसायकलीवर आलेल्या दोन संशयितांनी पायी चालत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची लहान पोत हिसकावून धुमस्टाईल पसार झाल्याची घटना आज दि 26 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 26 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील वरझडी रोडवर स्वामीनारायण मंदीर जवळील रस्त्यावर महिला पायी चालत असतांना मोटरसायकलीवर भरधाव वेगाने आलेल्या दोन संशयितांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची लहान पोत हिसकावून दोघेही संशयित स्वामीनारायण मंदीर रोडने कॉलनी रोड परिसरातून धुमस्टाईल पसार झाले.यावेळी गळ्यातील एक चेन रस्त्यावर पडली तर एक सोन्याची चैन घेऊन संशयित पसार झाले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले असून चौकशी सुरु आहे.पोलीसांकडून परिसराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे.याबाबत रात्री उशीरापर्यंत कार्यवाही सुरु आहे.