
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील भावीकांचा देवमोगरा मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पिकअप वाहनाचा एक्सल टुटल्याने वाहन पुलाखाली कोसळल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले.जखमी रुग्णांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार हिना गावीत, बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे,आमदार काशिराम पावरा आमदार राजेश पाडवी ,जिप सभापती कैलास पावरा, जिप सदस्य योगेश बादल,रमण पावरा,सुनील पावरा,हरी पावरा,रवींद्र शिंदे,सय्यद भाई, गजू पाटील आदींनी रुग्णांची विचारपूस करत मदतकार्य केले.

बोराडी येथील रामनगर येथील रहिवासी दि.१५ मार्च रोजी देव मोगरामातेच्या दर्शनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील देव मोगरा मातेच्या दर्शनासाठी गेले होते.दि.१६ मार्च रोजी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास खापर गाव व उदापूर गावाच्या दरम्यान अक्कलकुवा रस्त्यावर अचानक पिकअप वाहनाचा एक्सल तुटल्याने वाहन पलटी होऊन पुलाच्या खाली कोसळली.या अपघातात चंद्रसिंग रामदास पावरा (वय (३९) व दारासिंग बुधा पावरा (वय ५६) यांचा जागीच मृत्यू झाला.व इतर प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी नंदुरबार व अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेले आहे. यातील तीन भाविकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या अपघातात चंद्रसिंग रामदास पावरा (वय (३९) व दारासिंग बुधा पावरा (वय ५६) यांचा जागीच ठार झाला आहेत. या अपघातात जखमींमध्ये हिरालाल आजऱ्या पावरा, सुनिल हुसन्या पावरा,दादू पावरा, गायत्री राजू पावरा,उषा पावरा, कालूसिंग जामसिंग पावरा,संजय बडे,बायनु पावरा,दिपक रणसिंग पावरा, रामबाई रामसिंग पावरा, देवा दला पावरा, भरत देवा पावरा, भारती राजू पावरा, बल्या लालसिंग पावरा, कुणाल मुकेश पावरा, रूपाली तुषार पावरा, आदी भाविकांचा समावेश आहे.
