बातमी कट्टा:- शिरपूर शहादा रस्त्यावर शिरपूर कडे जाणाऱ्या टाटा मॅजिकला पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे.या अपघातात 5 प्रवाशी जखमी झाले असून दोघांना जास्त दुखापत झाल्याने धुळे येथे हलविण्यात आले आहे.सदर अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास अर्थे गावाजवळ म्हाळसाई पेट्रोलपंप लगत झाला आहे.
https://youtu.be/pnn-Ltm9sgw व्हिडीओ क्लिक
वरुळ गावायेथील टाटा कंपनीची एम एच 18 बीसी 7702 क्रंमाकाची टाटा मॅजिक प्रवासी घेऊन शिरपूर कडे येत असताना अर्थे गावाजवळ म्हाळसाई पेट्रोल पंप लगत सकाळी साडे 10 वाजेच्या सुमारास अर्थे कडून वरूळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम एच 18 एझेड 5011 या क्रमांकाच्या पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात टाटा मॅजिकचे चालक दिनेश दयाराम कोळी वरुळ,गोरख नागो भिल जवखेडा,प्रशांत दगा पाटील भामपूर व भामपूर येथील एक नाव समजू शकले नाही असे चार प्रवासी गंभीर जखमी झाले तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ते अपघात स्थळावरून दुसऱ्या वाहनाने निघून गेले.तर या चार ही गंभीर जखमीना 108 क्रंमाकाच्या अब्युलन्स ने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र त्यात दिनेश दयाराम कोळी व एक भामपूर येथील व्यक्तींना जास्त दुखापत झाल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.पोना अशोक धनगर दवाखान्यात पंचनामा केला असून पोहेकॉ चौधरी,पोना अनिल शिरसाठ,पोकॉ यांनी घटनास्थळा चा पंचनामा केला,याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वार्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने मोटारवाहन अपघाची नोंद करण्यात आली आहे.