बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील शेतकर्यांना पिक विम्यासह अतिवृष्टीतील नुकसान भरपाईचा लाभ पूरेपुर मिळावा आणि पात्र असलेला एकही शेतकरी वंचित राहता कामा नये अशा सुचना आ.कुणाल पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.दरम्यान याप्रश्नी शेतकरी,कृषी विभाग आणि पिक विमा कंपनीच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलविण्याच्या सूचना आ.पाटील यांनी दिल्या आहेत.
पिक विमा आणि अतिवृष्टीतील नुकसान भरपाई संदर्भात शिरुड,बोरकुंड,रतनपुरा परिसरातील शेतकर्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांची आज दि. 14 डिसेंबर रोजी भेट घेतली. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक विठ्ठल जोशी,तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेतली.धुळे तालुक्यातील शेतकर्यांना पिक विम्याची भरपाई मिळावी म्हणून सतत पाठपुरावा करीत आहेत.अनेक शेतकरी पिक विमा आणि अतिवृष्टीतील नुकसान भरपाईपासून वचिंत राहिले आहेत. तालुक्यातील 24 हजार शेतकर्यांनी पिकविमा काढला आहे. त्यापैकी 8 हजार शेतकर्यांनी नुकसानीची वैयक्तीक तक्रार विमा कंपनीकडे केल्याने त्यांचा वैयक्तीक पंचनामाही करण्यात आला आहे.त्यानुसार त्यांना टप्प्याने भरपाईही मिळत आहे.
दरम्यान पिकविम्याचा लाभ पात्र असलेल्या शेतकर्यांना मिळावा म्हणून लवकरच विमा कपंनीचे अधिकारी, व कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याची सुचना आ.कुणाल पाटील यांनी केली. अतिवृष्टीतील नुकसनीचा एनडीआरएफच्या निकषानुसार सरसकट पंचनामा करण्यात आला आहे.सदर पंचनामा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पिक कापणीच्या अहवालानंतर उत्पादनातील घट लक्षात घेवून विम्याची रक्कम शेतकर्यांना देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्यांनी यावेळी सांगितले.यावेळी झालेल्या बैठकिला कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर,बोरकुंडचे माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, पं.स.चे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, प्रभाकर भदाणे, आर.के.वाघ, दिलीप बिरारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.