बातमी कट्टा:- पिस्तूलातून गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पिस्तूलचे मॅगझिन व गोळीचा भाग मिळून आले आहे.
धुळे तालुक्यातील नेर गावाजवळ असलेल्या उभंड- पिंपरखेड येथे यशवंतराव बागूल या तरुणाची पिस्तूलातून गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पिस्तूलचे मॅगझिन व गोळीचा भाग मिळून आले आहे.
रात्री उशिरापर्यंत या घटनेचा तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू होता, या हल्ल्यात मारेकऱ्यांमध्ये 4 ते 5 जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत आहे, घटनास्थळाचा पंचनामा, नमुने घेण्यासह पोलीस कारवाई उशिरापर्यंत सुरु होती, जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.