पुन्हा त्याच ठिकाणी अपघात, पळासनेर येथील घटना,

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताच्या ठिकाणीच पुन्हा भरधाव ट्रकचे ब्रेक फेल होऊन उलटल्याने अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.या जिवीतहानी टळली असून चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत.

बघा व्हिडीओ

पळासनेर येथे काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता त्या अपघातात बसस्थानकाचे नुकसान झाले होते.आज ब्रेक फेल झालेला ट्रक पुन्हा त्या अपघातग्रस्त बसस्थानकाचा शिल्लक असलेल्या लोखंडी पाईपला धडकला.यावेळी बस स्थानकावर कोणीही नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.इंदौर येथून एमपी 09 एच एच 5777 क्रमांकाची ट्रक बटाटा घेईन मुंबई आग्रा महामार्गाने धुळे कडे जात होती दरम्यान सकाळीच्या सुमारास शिरपुर तालुक्यातील पळासनेर जवळ ब्लॅक स्पॉटवर सदर ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला.

बघा व्हिडीओ

त्यात चालक जाहोर शहा शाहीन शहा आणि सहचालक हैदर शहा रा.उज्जैन मध्यप्रदेश हे किरकोळ जखमी झाले.यावेळी ट्रकमधील बटाटे रस्त्यावर पडले.अपघाताची माहिती मिळताच मृत्युंजय देवदुत , ग्रामस्थ आणि तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.महामार्ग पोलिस व टोलचे कर्मचारी देखील घटना घटनास्थळी दाखल होत अपघातस्थळावरील ट्रक बाजूला करण्याचे काम सुरु होते.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: