बातमी कट्टा:– शिरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या रेशन दुकानदारांकडून व लाभार्थींकडून धान्य खरेदी करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्रीच्या उद्देशाने गोडाऊन मध्ये अवैध धान्य साठा ठेवल्याची माहिती मिळाल्याने घटनास्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांसह पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकत आयशर,दोन रिक्षांसह 10 लाख ६५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल दि २:४५ वाजेच्या सुमारास जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ आणि तहसीलदार आबा महाजन यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीवरून शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील पेट्रोल पंपाच्या उजव्या बाजूला असलेल्या जागेवर एम.एच.१८ बिए ०२५२ या क्रमांकाची आयशर वाहन आढळून आली.या आयशरची तपासणी केली असता त्यात १०९ तांदुळाच्या गोण्या आढळून आले.घटनास्थळी चालक उपस्थित नव्हता.तसेच अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्गावरील कळमसरे गावाच्या हद्धीत पत्राच्या गोडाऊन मध्ये तांदूळाच्या गोण्या आढळून आले तर एम.एच १९ एक्यु ७३०५ व एम.एच १८ एन ६१३८ या वाहनात तांदुळाच्या गोण्या आढळून आले.याबाबत गोडाऊनचे भाडे करार धारक महेंद्र लालाराम जाट रा.भगवान पार्क शिरपूर हे घटनास्थळी हजर होते. त्यांच्या कडे धान्याबाफत कोणताही अधिकृत पावत्या आढळून आल्या नाहीत. सदर प्लॉट हा राकेश गंगाराम बिविस्कर असल्याचे समजले.याबाबत पुरवठा विभागाने आयशर दोन रिक्षा व धान्य असा एकुण १० लाख ६५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सदरचा धान्य साठा शिरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या रेशन दुकानदार आणि लाभार्थी यांच्याकडून खरेदी करुन काळ्या बाजारात चढ्या भावात विक्री करण्याच्या उद्देशाने गोडाऊन मध्ये अनाधिकृत साठा केल्या प्रकरणी पुरवठा निरीक्षक अपर्णा लक्ष्मणराव वडुरकर यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात महेंद्र लालराम जाट,राकेश गंगाराम बाविस्कर, अक्षय संजय बेलदार ,रिक्षा चालक व मालक विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.