पुलावरुन ट्रक कोसळला तापी नदीत

बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातून चणादाळ घेऊन धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक थेट तापी नदीत पडल्याची घटना आज दि 26 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.सदर ट्रक इंदौर होऊन कर्नाटक कडे जात होता .

बघा व्हिडीओ

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदीपुलावर मध्यप्रदेश कडून धुळ्याकडे जाणाऱ्या एम.पी.09एच एच 6167 क्रमांकाची ट्रक तापी नदीत कोसळल्याची घटना दुपारी 4 ते 4:30 वाजेदरम्यान घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांसह नरडाणा पोलीस स्टेशनचे भरत चव्हाण व कर्मचारी दाखल झाले होते.

बघा व्हिडीओ

चालकाने सदर ट्रक सावळदे येथे चहापाणी साठी थांबवली होती.यावेळी क्लिनर कालु पटनाकर हा तेथेच थांबला व चालक अनिल मदन बडोले राहणार उपडी खरगोन मध्यप्रदेश वय 32 हा ट्रक घेऊन धुळ्याकडे निघाला होता. यावेळी सावळदे तापी पुलावरुन ट्रक जात असतांना ट्रक थेट तापी नदीत कोसळला.ट्रकमध्ये नेमक काय होते ? ट्रक कुठे जात होता. याबाबत शिरपूर शहर पोलीसांकडून व शिरपूर टोल नाका कर्मचारींकडून चौकशी सुरु आहे.

बघा व्हिडीओ

WhatsApp
Follow by Email
error: