पुलावरून तापी नदीत युवकाची आत्महत्या

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील सावळदे लगत तापी नदी पुलावर दुचाकी उभी करून धुळे तालुक्यातील एक युवकाने तापी नदी पुलावरून नदी पात्रात उडी घेतल्याची घटना 18 एप्रिल 2022 रोजी सोमवारी दुपारी घडली आहे.


तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावर 18 एप्रिल 2022 रोजी सोमवारी दुपारी नदी पुलावरील धुळे कडून येणाऱ्या मार्गावर नकाणे येथील अंदाजे 18 ते 20 वर्षं वयोगटातील युवकाने दुचाकी उभी करून नदी पात्रात उडी घेतांना पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी पाहिले.त्यांनी वाहने थांबवून नदीपात्रात डोकावले असता सदर युवक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आले मात्र काही साधन नसल्याने नागरिकांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली सदर युवकाचे एक दोनदा पाण्याबाहेर आला मात्र त्यानंतर तो बुडाला. घटनास्थळी नातेवाईक दाखल झाले असून मृतदेहाचा पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध केला जात आहे.मात्र सदर युवकांचे नाव समजू शकले नाही.मुंबई आग्रा महामार्गावरील सावळदे येथील तापी नदी पुल हा सुसाईड पॉईंट झाला असून रोजच एक ना एक व्यक्ती अज्ञात व्यक्ती नदी पात्रात उडी घेऊन आपले जीवन समाप्त करीत आहे तरीही कोणत्याही उपाययोजना करण्याकडे महामार्ग प्रशासन व शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केली.

WhatsApp
Follow by Email
error: