बातमी कट्टा:- पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर केंद्र सरकारला कमी करता आलेले नाहीत या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शहरात सायकल रॅली काढण्यासाठी आली होती.

धुळे शहरातील महात्मा गांधी चौकापासून युवक काँग्रेसच्या वतीने सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली होती.पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर केंद्र सरकारला कमी करता आलेले नाहीत,या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी धुळे जिल्हा
युवक काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढली होता.पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत.केंद्र सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरलेला आहे.या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत.कोरोनाच्या संकट काळामध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी उलट भाववाढ होत असल्याचा निषेध युवक काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आला.