पेडकाई माता मंदीर परिसरात चोरीचा प्रयत्न,पुजाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

बातमी कट्टा:- पेडकाई देवी माता मंदीर परिसरातील दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करतांना गावातील नागरिकांनी मंदिराच्या पुजाऱ्यासह आठ ते नऊ जणांना रंगेहाथ पकडत पोलीसांच्या ताब्यात दिल्याची घटना रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली आहे.याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावाजवळील कुलदैवत म्हणून प्रचलित असलेले पेडकाई देवी माता मंदीर परिसरातील दुकानांमध्ये काल दि 26 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मंदिराच्या पुजारीसह ईतर संशयितांकडून चोरीचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा शिंदखेडा पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शशीकांत पंडित बोरसे रा.साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,फिर्यादी शशिकांत बोरसे यांची पेडकाई देवी माता मंदिर परिसरात पुजा साहित्य विक्रीचे दुकान आहे.त्यांच्या सोबतच निलेश गिरासे ,आधार कोळी, संदिप गिरासे,लाला पाटील,सागर गिरासे यांचे देखील पुजा साहित्य विक्रीचे दुकान आहे.

काल दि 26 रोजी सायंकाळी 7 वाजता फिर्यादी शशीकांत बोरसे हे आपली दुकान बंद करुन घरी गेले असता रात्री 9 वाजता त्यांना वैजनाथ पेढेवाला यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की,पेडकाई माता मंदीर परिसरात काही संशयित व्यक्ती आले आहेत लवकर बोलवून घेतले.यानंतर शशिकांत बोरसे हे गावातील ईतरांसह मंदीर परिसरात गेले असता तेथे पुजा साहित्यच्या दुकानात काही ईसम वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न करतांना संशयितरित्या दिसून आले. त्या इसमांना पकडले असता त्यात पेडकाई माता मंदीराचे पुजारी किशोर साहेबराव गुजर रा.चिमठाणे,प्रकाश फकीरा सोनवणे रा.बुरझड,विजय गजानन गुरव,जमल्या वस्ता वळवी रा.नवागाम,विनोद जयस्वाल रा.सुरत,अशोक कुमार शिवंभर पटेल रा.सुरत,गणेश आमश्या वसावे रा.मांझरे नंदुरबार,नितीन रमेश धुमाळ रा.दोंडाईचा,मनोहर भाऊराव पाटील रा.अखाडे ता.साक्री आदींना पकडत शिंदखेडा पोलीसांच्या ताब्यात दिले.याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: