बातमी कट्टा:– गौतमी पाटील या काल दि १६ रोजी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आले होते.महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गौतमी पाटील यांचा दोंडाईचा येथे कार्यक्रम संपन्न झाला.त्यांचा दोंडाईचा येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
गौतमी पाटील आता वेब सिरीज मध्ये दिसणार आहेत.वेब सिरीजचे नाव मात्र तिने अजून जाहीर केलेले नाही. मराठी चित्रपटात काही आईटम नंबरवर देखील ती चित्रपटांमध्ये थिरकाताना दिसणार असल्याचं गौतमीने सांगितला आहे. आपल्या नृत्याच्या कार्यक्रमात कुठलाही प्रकारचा अश्लिलपणा नाही याची आपण काळजी घेतो असे गौतमी पाटील सांगायला विसरलेली नाही. नृत्याचा कार्यक्रम हा अधिक बहारदार व्हावा यासाठी कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये काही बदल करणार असल्याचेही तिने यावेळी संकेत दिले आहेत.