पोटात चाकूने सपासप वार… रुग्णालयात उपचारासाठी सुरु…

बातमी कट्टा:- तोंडावर वीट मारून जखमी केल्याने पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यासाठी निघालेल्या दोन जणांपैकी एकाच्या पोटात चाकूने सपासप वार करण्यात आला असून मदतीसाठी आलेल्या आणखी एकावर चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे घडली.या चाकु हल्ल्यात बोराडी येथील संदीप विश्वासराव पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत तर राहुल देविदास पाटील, वय ४१ आणि निशांत सुरेश शिंदे वय.३८ हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी राहुल देविदास पाटील बोराडी यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी म्हटले की,दि 18 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी राहुल पाटील यांच्या घराच्या मागील बाजुस 10 ते 15 मुलांचा घोळका जमून जोरजोरात गप्पा मारून हष्यकलोळ करून आरोळ्या मारत होते.त्यांना आरोळ्या मारू नका सांगितल्याने शुभम किशोर पाटील याने फिर्यादी राहुल पाटील यास हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.जवळच पडलेल्या विटाने फिर्यादी राहुल पाटील यांच्या तोंडावर मारून फिर्यादी राहुल पाटील यास रक्तभंबाळ केले.यावेळी फिर्यादी राहुल पाटील यांना जखमी अवस्थेत चुलत भाऊ सोनु ऊर्फ संदिप पाटील यांनी डॉक्टरांकडे घेऊन प्राथमिक उपचार करून फिर्यादी राहुल पाटील यांना घेऊन संदिप पाटील पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी जात असतांना यावेळी शुभम किशोर पाटील याने भुर्या उर्फ रमेश उदेसिंग पावरा याला चेतावणी दिली त्यामुळे भुऱ्या पावरा याने जिवे मारण्याच्या उद्देशाने सोनू उर्फ संदीप पाटीलच्या पोटात सपासप वार केला व फिर्यादी राहुल पाटील यास शुभम पाटीलने धक्काबुक्की केली.याचवेळी निशांत सुरेश शिंदे हा मदतीसाठी आला असता त्याच्या मांडीवरही चाकूने वार करण्यात आला.घटनास्थळावरून शुभम पाटील व भुऱ्या पावर पळून गेले.पोटात चाकुने वार केल्याने संदिप पाटील जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडले.संदिप पाटील यांना शिरपूर येथे उपचारासाठी दाखल केले मात्र तेथून यांच्यावर धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यावरून राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनात शुभम किशोर पाटील व भु-या उर्फ रमेश उदेसिंग पावरा दोन्ही रा.बोराडी ता.शिरपुर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: