पोलिसांना बघताच दोघेही बाजरीच्या शेतात घुसले…मात्र पोलिसांच्या पाठलागात झाले पितळ उघडे…

बातमी कट्टा:- बाजरीच्या शेतात पळून गेलेल्या दोन्ही संशयितांचा पाठलाग करुन त्यांच्या ताब्यातून ५ पिस्तूल व ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे भुषण पाटील, संजय भोई,स्वनील बांगर,योगेश मोरे ,कृष्णा पावरा,अल्ताप मिर्झा यांंनी मध्यप्रदेश कडून शिरपूर तालुक्यातील खामखेडा फाट्याजवळ सापळा लावला असता.तेथे एम एच २० एफ ई ५३६३ क्रमांकाच्या मोटरसायकलीने दोन जण संशयितरित्या येतांना पोलिसांना दिसून आले.त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संशयितांनी मोटरसायकल सोडून बाजरीच्या शेतात पळ काढला.त्या दोघांचा पोलिस पथकाने बाजरीच्या शेतात पाठलाग केला असता त्यांच्याकडे पांढऱ्या रुमाला गुंडाळून ठेवलेले ५ बनावट पिस्तूल व ११ जिवंत काडतुसे मिळुन आलीत.दोघांची विचारपूस केली असता मध्यप्रदेश राज्यातील उमर्टी येथून घेतल्याचे सांगितले असून दोघांनी स्वताचे नाव बाबासाहेब रामभाऊ मिसाळ रा जालना व परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ रा. जालना असे सांगितले असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार,रफिक मुल्ला,संदिप ठाकरे,भुषण पाटील,संजय भोई,स्वप्नील बांगर,योगेश मोरे,कृष्णा पावरा,अलताफ मिर्झा ,मनोज पाटील आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: