पोलिसांनी ताब्यात घेतलेला तो “गांजा” कुठे जात होता ? ठाणे (मुंबई) येथील संशयित चालक ताब्यात…

बातमी कट्टा:- मुंबईच्या ठाणे येथील एकाला चारचाकी कारमध्ये गांजा वाहतूक करतांना थाळनेर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेत त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सा.पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनआ गांजा वाहतुकी बाबत गोपणीय माहीती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे थाळनेर पोलीसांनी शिरपूर चोपडा रस्त्यारील सावेर शिवारातील दत्तप्रभू दुकनाजवळ सापळा रचला होता.यावेळी सायंकाळच्या सुमारास चोड्याकडून शिरपूर कडे येणाऱ्या एम.एच 04,जेव्ही 0212 या कारर वर पोलिसांना संशय गेल्याने पोलीसांनी कार थांबवली. चालकाची विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलेला 26 किलो 900 ग्रँम वजनाचा गांजा मिळुन आला.यावेळी पोलीसांनी गांजा,कारसह संशयित चालक रमेश प्रकाश जाधव वय 32 रा.ठाणे यालाताब्यात घेतले.पोलिसांनी गांजासह, कार,मोबाईल असा एकुण 10 लाख 950 किंमतीचा मुद्देमाल जप्त रण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: