
बातमी कट्टा:- मुंबई पोलिस म्हणून कार्यरत असलेल्या चाळीसगाव येथील 28 वर्षीय तरुणाचा क्रिकेटच्या सामन्यात झालेल्या वादातून चार संशयितांनी तलवारीने सपासप वार करत खून केल्याची खळबळजनक घटना आज दि 14 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
चाळीसगाव येथील शुभम अर्जुन आगोणे वय 28 हे मुंबई पोलीस दलामध्ये पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे क्रीकेटचे सामने खेळले जात आहे.याठिकाणी सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे रविवारी सकाळी एका गटासोबत किरकोळ वाद झाले. हा वाद विकोपाला गेला आणि पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्गाजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चार जणांनी शुभम यांच्यावर तलवारीने सपासप वार करत गंभीर जखमी केले. रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या शुभम आंगणे यांना नागरीकांनी तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टारांनी तपासून शुभम आगोणे यांना मृत्यू घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह मित्रांनी एकच आक्रोश केला.यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकाऱ्यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली.याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.