
बातमी कट्टा:- आयजी पथकाच्या कारवाईनंतर धुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे येथील पोलीसांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून एक मशीनगन आणि 20 पिस्तूल ताब्यात घेतले होते.यानंतर शिरपूर तालुका पोलीस देखील सतर्क झाली असून दोन दिवसांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर दोन संशयितांकडून चार पिस्तूल व जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली होती.आज पुन्हा शिरपूर तालुका पोलीसांनी तीन पिस्तूल आठ जिवंत काडतुसे व स्विफ्ट कार जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या अधारे शिरपूर तालुका पोलीसांनी भोईटी गावाजवळ सापळा लावला.त्यादरम्यान एम.एच 12 क्यु जि 0472 क्रमांकाची स्विफ्ट कार संशयित रित्या येतांना दिसली पोलीसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार थांबली नाही. पोलीसांनी कारचा पाठलाग करत कारला थांबवण्यात आली.कार मधील सईद आस मोहम्मद सय्यद वय 31 वर्ष रा.श्रीरामपूर जि.अहमदनगर नामक संशयिताला ताब्यात घेत अंगझडती व कारची पाहणी केली असता त्याच्याकडे 1 लाख 35 हजार किंमतीचे मॅगझीनसह तीन बनावट पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे मिळुन आली.पोलीसांनी स्विफ्ट कारसक्ष मुद्देमाल जप्त करत संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सा.पोलीस निरीक्षक जयेश खलाणे,उपनिरीक्षक संदिप पाटील,कृष्णा पाटील, सागर ठाकूर ,संतोष पाटील,योगेश मोरे,रोहिदास पावरा व चालक इसरार फारुकी आदींनी केली आहे.