बातमी कट्टा:- साक्री शहरातील नागपूर सुरत महामार्गावरील बायपासलगत असलेल्या कॉलन्यांतील घरे फोडून ऐवज लांबवणार्या चोरट्यांना दरोडासाठी लागणारे साहित्यांसह पहाटे साक्री पोलीसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांचा पाठलागाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
साक्री शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती यामुळे पोलीसांकडून चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत होत्या.मात्र आज पहाटे पोलीस आणि चोरांचा थरारक फिल्मीस्टाईल दृश्य बघावयास मिळाले आहे.पोलीसांना तीन चाकी रीक्षाने संशयित जात असल्याचे लक्षात आले होते.पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ते थांबले नाही. पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला असता संशयितांकडून जोराने रिक्षा पळविण्यात येत होती. रिक्षा थांबण्याचे नाव घेत नव्हती पोलीसांच्या दोन वाहनांनी त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला असता अखेर पोलीसांशी शिताफीने त्या रिक्षाला रोखले त्यातुन एकाला ताब्यात घेण्यात आले तर तेथून पसार झालेल्यांपैकी एका संशयिताला उसाच्या शेतातून ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी विजयसिंग अंधानसींग सिकलकर वय 20 रा.कल्यापुर्व ठाणे व लक्ष्मण रमेश आटोळे वय 29 रा.मोहाडी धुळे या दोघांना दरोडा टाकण्यासाठी लागणारे हत्यारे चाकु,सुरा,टामी,कटर स्क्रुड्रायवर,पाना व ऑटोरिक्षासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील मंलसिंग सिकलकर,जगपालसींग सिकलकर व आणखी एक संशयित नाव माहीत नाही हे तीनही संशयित पळून गेले आहेत.पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पथकाने मोठ्या जिद्दीने या संशयितांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्या थरारक पाठलागाचा व्हिडीओ मात्र प्रचंड व्हायरल झाला असून साक्री पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.