पोलीसांनी नाशिकच्या एका संशयितासह तिघांना घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- चोरीच्या मोटारसायकली घेऊन आलेल्या तीन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून यात नाशिक येथील एक तर धुळे येथील दोघा संशयितांचा समावेश आहे.मुंबई आग्रा महामार्गा क्र तीनवरील ग्रीन पार्क हॉटेल जवळ पोलीसांनी कारवाई करत मोटरसायकलसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

दि ४ रोजी नरडाणा पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांना ओपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील ग्रिन पार्क हॉटेल जवळ तीन इसम संशयितरित्या मोटरसायकलीवर आल्याचे आढळून आले पोलीसांनी तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी स्वताचे नाव हर्षवर्धन सतिश निकम रा.सिडको नाशिक, सुरज कृष्णा मैराळे वय २४ रा.बोरविहीर धुळे व भावेश सुभाष ढमढेरे वय १९ विष्णू नगर देवपूर धुळे असे सांगितले.मोटारसायकलींचे कागदपत्रे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीसांनी मोटरसायकली बाबत अधिकची तपासणी केली असता नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीस गेले बाबत गुन्हा दाखल असून सदर मोटरसायकली या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांविरुध्द नरडाणा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई सा.पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांच्यासह संदिप काळे,पोहेकाँ माळी,खेडवन,सचिन वाघ,मुकेश अहिरे,अर्पन मोरे,दिपक भामरे,रविंद्र महाले व होमगार्ड जितेंद्र रणदिवे आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: