बातमी कट्टा :- गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या नाशिकच्या सहा संशयितांना शिरपूर तालुका पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन पिस्तूल एक अतिरिक्त मॅगझीन आणि सहा जिवंत काडतूसांसह चारचाकी क्रुज वाहन जप्त करण्यात आले आहे.याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
दि 12 रोजी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गोपणीय माहिती प्राप्त मिळाली होती त्या माहितीच्या आधारे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ,,संदिप पाटील, संदिप ठाकरे, संजय भोई,योगेश मोरे,प्रकाश भिल,मुकेश पावरा, इसरार फारूकी आदींनी शिरपूर तालुक्यातील भोईटी गावाच्यापुढे सापळा रचून थांबले यावेळी एम एच 15 सिटी 5688 क्रमांकाची चारचाकी वाहन येत असल्याचे दिसून आले.पोलीसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन न थांबवता जोराने वाहन पळवून शिरपूर च्या दिशेने निघाले.त्या वाहनाचा पोलीसांनी पाठलाग करून थांबवली.वाहनाची झडती घेतली असता त्यात मॅगझीनसह तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतूसे आणि एक अतिरिक्त मॅगझीन पोलीसांना मिळून आले.वाहनात असलेले मोहीत राम तेजवानी वय २१ वर्ष ,आकाश विलास जाधव वय २४,राज प्रल्हाद मंदोरिया वय २१, अजय जेठा बोरीस वय २९,श्रीनिवास सुरेंद्र कानडे वय २४,दर्शन चमनलाल सिंधी वय २१ सर्व राहणार नाशिक आदींना पोलीसांना ताब्यात घेतले.पोलीसांनी तीन पिस्तूल, काडतूसे व चारचाकी वाहन असा एकुण ७ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा