पोलीसांनी पाठलाग करुन पिस्तूल घेऊन जाणाऱ्या संशयिताला घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- गावठी पिस्तूलसह एकाला शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले तर एक ईसम फरार झाल्याची घटना घडली आहे.संशयिताकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे व मोटारसायकल जप्त केले आहे.

शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे शिरपूर फाटा येथे पोलीसांनी सापळा रचत दोन ईसमांना मोटरसायकलीवर येतांना बघितले.त्यांना थांबविले असता दोघेही न थांबता मोटरसायकलीने फरार होत असतांना पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला यावेळी मोटरसायकलवर मागे बसलेला संशयित उडी मारून पसार झाला तर मोटरसायकल चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले.संशयिताची झाडाझडती केली असता त्याच्या कडे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आले.पोलीसांनी विचारपूस केली असता त्याने स्वताचे नाव समीर गफ्फार शेख वय 24 रा.अंबिकानगर शिरपूर व पळून गेलेला भुरा उर्फ हसनेन शेख लतिफ मन्यार रा कुंभारटेक शिरपूर असे सांगितले.पोलीसांनी त्यांच्या ताब्यातील पिस्तूल, जिवनत काडतुसे व मोटरसायकल असा एकुण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख ,शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी, मुकेश पावरा, गोविंद कोळी,विनोद अखडमल, प्रविण गोसावी व प्रशांत पवार व होमगार्ड नाना अहिरे,मिथुन पवार, चेतन भावसार आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: