पोलीसांसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न…

बातमी कट्टा:- साक्री येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणातील पिडीत कुटुंबीयाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.पोलीस प्रशासन व अधिकारींमुळे यामुळे मोठा अनर्थ टळला.यावेळी कुटुंबीयांकडून रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आले.

व्हिडीओ News

साक्री नगरपंचायतीच्या निकालानंतर साक्रीत वाद निर्माण झाला होता.वादादरम्यान मोहिनी जाधव या महिलेचा मृत्यू झाला.याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात साक्री येथील तहसील कार्यालयासमोर मयत मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अद्यापही मारेकऱ्यांचा शोध न लावल्याचा आरोप करीत तसेच मृत मोहिनी जाधव या महिलेच्या लहान मुलांना कुठल्याही प्रकारची प्रशासनातर्फे मदत केली नसल्याचा आरोप यावेळी पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनावर केला आहे.

घटनास्थळी पोलीस प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.पीडित कुटुंबियांनी आपल्या मागण्यांसाठी निषेध नोंदवत रास्तारोको केला आहे.यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिडीत कुटुंबीयांसोबत फोनवर संपर्क साधत योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Video

WhatsApp
Follow by Email
error: