बातमी कट्टा:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मोहाडीनगर पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात पोलीसांसह 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
पोलीस अधिक्षक प्रवीण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव पोलीस उपअधीक्षक कातकाडे पो नि हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्राच्या अमृत महोत्सव निमित्त धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोहाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि भूषण कोते, पोसई सुर्यवंशी, पोसई राऊत, पोसई कौठूळे,पो हेकॉ काळे ,पोहेकॉ थोरात ,पोना कोठावदे पोना पाटील, पोकॉ गणेश भामरे , पॉको जितेंद्र वाघ ,पॉकॉ समीर पाटील ,पोकॉ राहुल गुंजाळ, पोकॉ वाघ असे सर्व मोहाडी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासक्ष परिसरातील नागरिकांनी सभाग घेत 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.